कर्मचाऱ्यांशी जिव्हाळा, सर्वांच्या कुटुंबातला भाग बनले; गटविकास अधिकाऱ्याच्या बदलीने कर्मचारी रडले!
1096 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करासर्वांशी आपुलकीची वागणूक, वेळोवेळी मार्गदर्शन, सर्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध जोपासणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याची बदली झाली आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले... नाशिकच्या निफाड तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड. पाच वर्ष त्यांनी इमानी इतबारे गटविकास अधिकारी म्हणून काम केलं. विकासाची कामं केली... कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी ग्रामस्थांचीही मनं जिंकली. असा आपला लाडका अधिकारी सोडून जात असताना सर्वांनाच निरोप देणं जिवावर आलं.