जरांगे पाटलांच्या स्वागताला बेभान नाचला, रात्री अचानक जमिनीवर कोसळला अन् मृत्यू झाला
1070 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर होते.यावेळी नांदगावमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागताची तय्यारी करण्यात आलेली होती.यावेळी डिजेच्या तालावर एक दादासाहेब काळे नामक व्यक्तीने नृत्य देखील केलं होते.मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काळे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते अचानक कोसळले.त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दरम्यान, नांदगाव दौऱ्यावर आलेले मनोज जरांगे यांनी कार्यक्रम संपल्यानंतरग्रामीण रुग्णालयात काळे यांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन आणि चौकशी केली.