नाशिकमध्ये समाधानकारक पण मनमाडकर वेटींगवर, पावसासाठी नमाज पठण करुन मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना!
1233 views
nashik चे व्हिडिओ सबस्क्राईब करापाठ फिरवलेल्या पावसाने नाशिकसह जिल्हाभरात दोन दिवसांपूर्वी जोरदार कमबॅक केले होते.मात्र अद्यापही मनमाड सह चांदवड, नांदगाव, मालेगाव परिसरात समाधानकार पाऊस झालेला नाही.त्यामुळे माणसांसह मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मनमाडमधील मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज पठण करत प्रार्थना केली आहे. समस्त मानव जातीसाठी, पशू-पक्ष्यांकरिता जिथे जिथे पाऊस नाही तिथे पाऊस पडू दे....शेतकरी चिंतामुक्त व्हावा, मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी मिळू दे, भरपूर पाऊस होई दे....अशी दुआ मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी करण्यात आली आहे.