दीड महिन्याचं बाळ घरात अडकलं, आईच्या काळजाचं पाणी पाणी, हिरकणीची पाईपावर चढून घरात एंट्री
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
एक हिरकणी जी स्वत:ला संकटात टाकून बुरुज उतरून , बाळापर्यंत पोहोचली होती आणि नाशिकमधली एक हिरकणीनं बिल्डींगच्या पाईपावर चढून घरात अडकलेल्या बाळापर्यंत पोहोचलीये. नाशिक शहरातील पेठ रोड भागातील तृप्ती स्वप्नील जगदाळे-सोनार यांनी बाळाच्या काळजीपोटी चौथ्या मजल्यावरुन ग्रीलचा आणि पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरण्याचं धाडस केलं. तृप्तीताई आणि त्यांचं दीड महिन्यांचं बाळ हे दोघेच घरी होते. बाळाला झोळीत झोपवून तृप्तीताई घरात स्वच्छता करत होत्या. कचरा गॅलरीत टाकण्यासाठी गेल्या आणि नेमक्या त्याचवेळी हवेच्या दाबामुळं गॅलरीचा दरवाजा बंद झाला. बाळ एकटं असल्यानं त्या घाबरल्या बाळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ग्रीलच्या बाजूनं असलेल्या पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या त्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरल्या. तिथून पायऱ्यांवरुन चौथ्या मजल्यावर जात घराच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला पोटाशी लावलं. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडून घरात गेल्या आणि बाळाला घट्ट उरशी धरलं.