मुलगी पळून गेल्यानं आई-वडिलांची आत्महत्या, नातेवाईकांकडून प्रियकराच्या घरासमोरच अंत्यसंस्कार
1238 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजन्मदात्या आई-वडिलांसमोरच प्रियकराच्या गाडीवर बसून मुलगी निघून गेली. मुलीचे आई-वडील तिला प्रियकरासोबत जाऊ नको अशा जीवाचा आटापिटा करून विनंती करत होते. मात्र मुलगी न ऐकता निघून गेली त्यामुळे हताश झालेल्या आई-वडिलांनी काही तासातच नाशिक शहरात रेल्वे खाली आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मुलीच्या आई-वडिलांचे प्रेत नातेवाईकांना दिले होते. मात्र संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आत्महत्या केलेल्या आई-वडिलांची मुलगी ज्या मुलाबरोबर निघून गेली, तो मुलगा देखील त्याच गावातील रहिवासी असल्याने मयताचे नातेवाईकांनी मुलाच्या घरासमोरच वरांड्यात मुलीच्या आई वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले , या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्ह्यात या प्रकाराने खळबळ उडाली आहे.