नाशकातून लोकसभेसाठी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर; श्रीकांत शिंदेंची भर सभेत घोषणा, कार्यकर्त्यांचा जल्लोष
1057 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार हेमंत गोडसेंनी ही जागा शिवसेनेकडेच राहावी...... अशी मागणी बोलून दाखवली.त्यानंतर, काहीच वेळात जाहीरपणे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली.गेल्या काही दिवसांपासून ही जागा भाजपकडे जाण्याची चर्चा होती.मात्र, श्रीकांत शिंदेंनी आज (१२ मार्च) या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.प्रभू श्री रामाचा धनुष्यबाण आपल्याकडेच राहणार, हेमंत गोडसेंना आता तिसऱ्यांदा लोकसभेत...... पाठवायचं आहे, असं आवाहन श्रीकांत शिंदेंनी केलं आहे.डॉ. श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेच उमेदवार असतील अशी घोषणा झाली आणि कार्यकर्त्यांनी......एकच जल्लोष केला.