महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा, त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कल्याण लोकसभेसाठी बावनकुळेंना पत्र
नवी मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी करणारे पत्र...दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिले आहे.गेल्याकाही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला आहे.त्यात एकनाथ शिंदेंच्या लेकाच्या जागेचीही मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.त्यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजप-शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.सोमवारी दिवा शहराचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात पक्षीय ताकद, लोकप्रतिनिधींचे संख्याबळ भाजप खासदारासाठी पोषक आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेचा उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा.अशी दिवा शहरातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची एकमुखाने मागणी असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्रावर भाजपच्या दिवा शहरातील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.