अजित पवार जानकरांवर भरभरुन बोलले, पण भर सभेतच राजेश विटेकरांनाही आमदारकीचा शब्द देऊन गेले!
1112 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकरांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.महायुतीकडून महादेव जानकर यांना परभणीची जागा देण्यात आली आहे.अर्ज भरल्यानंतर परभणीत महायुतीकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार...भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आणखी काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना महादेव जानकरांचं कौतुक केलं.सोबतच यावेळी बोलताना अजित पवार यांनी परभणीकरांना आणखी एक शब्द दिला.ते म्हणाले, मी परभणीकरांना सागंतो उद्याच्या सहा महिन्यांच्या आत मी...राजेश विटेकरला विधिमंडळांचा सदस्य केल्याशिवाय शांत बसणार नाही.