माझ्याकडे पैसे नाहीत, 'जगात जर्मनी भारतात परभणी' हेच माझं लक्ष्य, महादेव जानकरांचं परभणीत भाषण
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः दिल्लीमध्ये आम्हाला बोलावून घेतले. माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या सर्वांसमक्ष अमित शहा यांनी सांगितले की आपल्याला महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची जागा द्यायची आहे. आणि तेथेच माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय झाला. अशी माहिती रासपचे अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी दिली.