बंडू जाधव तू फार छोटा माणूस आहेस, माझ्या नादी लागू नको नाहीतर अवघड होईल तुझं : महादेव जानकर
3663 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करापरभणी मतदारसंघातून महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव अशी लढत होणार आहे.महायुतीचे उमेदवार जानकर आज परभणीच्या पूर्णा तालुक्यात गावोगावी प्रचार करत ग्रामस्थांच्या भेटी घेत होते.यावेळी ते म्हणाले, मी पवार साहेब, वसंत दादा, शंकरराल चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढलेलो आहे.नांदेड, सांगली, माढा, बारामतीत निवडणुकीला उभा राहिलो, आता गुलाल लावून घ्यायला परभणीला आलोय.बंडू जाधव तू फार छोटा माणूस आहेस, माझ्या नादाला लागू नकोस फार अवघड आहे तुझं.अशी थेट धमकीच महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी संजय जाधव यांना दिली आहे.मराठा समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्याचा निर्णय झाला.पण आपल्या परभणीचे खासदार संजय जाधव यांना इंग्रजी देखील येत नाही.त्यामुळे त्यांना काय निर्णय झाले हे देखील माहित नसावं असंही जाणकर म्हणाले.