नरेंद्र मोदी ज्यांच्या बळावर ते मोठे झाले आज ते त्यांनाच डुबवत आहेत | प्रकाश आंबेडकर
1088 views
परभणी चे व्हिडिओ सबस्क्राईब करापंजाब डख यांच्या प्रचारार्थ परभणीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतली.यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली.नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला असं आंबेडकर म्हणाले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच नरेंद्र मोदी आज दहा वर्षे पंतप्रधान पदी राहिले आहेत असंही आंबेडकरांनी सांगितलं.मात्र मोदी आता मोहन भागवतांची भेट देखील घेत नाहीत असं आंबेडकर म्हणाले.ज्यांच्या जीवावर मोदी मोठे झाले त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज त्यांना राहिली नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.