परभणीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, तरुणांचा धिंगाणा, पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?
1627 views
parbhani चे व्हिडिओ सबस्क्राईब करापरभणीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणांनी खुर्च्यांची केली मोडतोड केली यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलावर भाजप विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गौतमी पाटीलची होती. कार्यक्रम सात वाजता सुरू झाला. यानंतर जमलेल्या अनेकांनी हुल्लडबाजी सुरू केली. यानंतर खुर्च्या फेकाफेकी, तोडफोड सुरू झाली. पोलिसांनी ह्या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. हा प्रकार सुरू झाला आणि गौतमी पाटील आणि त्यांच्या सहकारी व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेल्या. त्यानंतर जमाव शांत झाल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. हा सर्व गदारोळ जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरू होता.