पुण्यात १०४ वर्षांच्या आजीसह ५१ जणांचा वाढदिवस एकत्रित साजरा, अख्ख्या गावाची हजेरी
1058 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१ जूनला बऱ्याच जणांचा वाढदिवस असतो असं म्हणतात. पुण्याच्या भोर तालुक्यातील म्हाळवडी गावात एकाच वेळेस 51 जणांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आलाय. गावातील तरुणांच्या कल्पनेतून हा सामूहिक वाढदिवस साजरा करम्यात आला. गावच्या मंदिरात केक कापून वाढदिवस सामुहिक रित्या साजरा करण्यात आला. गावातील दोन वर्षाच्या मुलासह 104 वर्षाच्या आजीचा यामध्ये सहभाग होता. तरुणांनी पुढाकार घेऊन वाढदिवस साजरा केल्यानं,जेष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. या सामूहिक वाढदिवसानिमित्त गावात एक प्रकारे सण असल्यासारखंच वातावरण होतं.