धैर्यशील मोहिते पाटलांच्या एन्ट्रीने माढ्यात गळती; इच्छुक अभयसिंह जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मोठा डाव टाकूनही माढ्यात पुन्हा एकदा शरद पवारांचं टेन्शन वाढलं आहे.धैर्यशील मोहिते पाटालांच्या प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाला गळती लागली असून अभयसिंह जगताप हे पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे अभयसिंह जगताप हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. जयंत पाटील, शरद पवारांसह चर्चा केल्यानंतर जगतापांची आज (१५ एप्रिल) प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींसह देखील बैठक असून २ दिवसांत मी माझा निर्णय जाहीर करेन असं सांगण्यात आलं आहे. मी स्वतःच निवडणूक लढवणार असल्यावर ठाम असून कुणाचं काम करणार हा निर्णय झालेला नाही, अद्यापही निर्णय विचाराधीन असल्याचं अभयसिंह जगताप म्हणाले.