घरातील 'सुनेला' वरिष्ठ 'परकी' म्हटले तर तुमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाणार नाही का? : अजित पवार
1165 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत वकील आणि डॉक्टरांचा मेळावा पार पडला.यावेळी अजित पवार यांनी भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल केला.यावेळी बोलताना अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला.ते म्हणाले, मी कधीही भेदभाव केला नाही. ४०-४० वर्ष एकदाच्या घरात सून येऊनही..तिला कधीही परकं मानलं नाही.. ती शेवटी घरचीच झाली. परंतु काही जण परकी मानतात.महिलांनी याच्याबद्दल बारकाईने विचार करायला पाहिजे. कारण तुम्हीही कुठे ना कुठे सून म्हणून आला आहात.परंतु तुम्ही सून म्हणून आल्यानंतर मालकीन झालात. आणि तुम्हाला जर घरातील वरिष्ठ परकीय म्हटलं...तर तळपायाची आग मस्तकापर्यंत जाणार नाही का? असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.