महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने अख्ख मंत्रिमंडळ प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार, दादांनी हात जोडून सांगितलं
1086 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बारामती तालुक्यातील सुपे येथे पाणी टंचाई बैठकीचे आयोजन केले.यावेळी बैठकीत संबोधित करताना अजित पवार यांनी आयोध्यावरून भाष्य केलं आहे.ते म्हणाले, अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे.पण या सोहळ्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळ वेगळी तारीख काढून प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेणार आहेत.अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये सांगितलं.महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊ, असंही हात जोडत सांगितलं.