त्यांच्याकडे प्रचाराला पैलवान असतील तर माझ्यासोबत वस्ताद आहेत, रवींद्र धंगेकरांनी मोहोळांना डिवचलं
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उमेदवारी मिळाल्या बाबत सदिच्छा भेट आणि मार्गदर्शसाठी ही भेट होती. त्यासोबत शरद पवार यांची मदत येणाऱ्या लोकसभेसाठी लागणार असल्याचं सांगितलं आहे. शरद पवारांसोबत भेट झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना डिवचले आहे. त्यांच्याकडे जर पैलवान प्रचरला असतील तर माझ्या सोबत वस्ताद आहेत असं धंगेकर म्हणाले.