कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, निखिल वागळेंवरील हल्ल्यानंतर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पुण्यातील दांडेकर पुलानजीक राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये निर्भय सभा ९ फेब्रुवारी रोजी पार पडली.या कार्यक्रमासाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. पुण्यातील डेक्कन भागातील खंडुजीबाबा चौकात त्यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. निखिल वागळे यांच्यावर घडलेला हल्ला दुर्देवी असून त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचे आदेश सीपीशी बोलून देतो असं अजित पवार म्हणाले.आपल्या महाराष्ट्रात असले प्रकार महायुतीचे सरकार कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.