एकीचा पाय घसरला, वाचवायला गेलेल्या आठही जणी बुडू लागल्या, दोघींना जलसमाधी
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लग्नानिमित्त बुलढाण्याहून आलेल्या नऊ मुली कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यापैकी एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडली, तर तिला वाचवण्यासाठी आठ जणींनी पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने त्याही पाण्यात बुडू लागल्या. परंतु सात जणींचे प्राण वाचले असून दोघीं जणींना जलसमाधी मिळाली. नऊपैकी आठ जणींचे वय १६ वर्षांखालील होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात ओढल्या गेल्या. त्यापैकी सात मुली व महिलांना प्रा. आ. केंद्र खानापूर येथे उपचारा करीता आणण्यात आले. बाकी मुली व महिला यांची प्रकृती स्थिर असून त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले. नऊ मुलींपैकी सात जणींना स्थानिकांनी वाचवले असून दुर्दैवाने धरणात बुडून दोन मुलींचा मृत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेबाबत सांगितलं...