बारामतीत १६० विद्यार्थ्यांना दाखवला ‘सत्यशोधक’ चित्रपट, शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी प्रतिक्रिया!
1039 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहापुरुषांचे कार्य केवळ पुस्तकातूनच न सांगता त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले तर विद्यार्थ्यांना प्रकर्षाने महापुरुषांचे कार्य समजेल. या हेतूने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरमे वस्ती येथील विद्यार्थ्यांना सत्यशोधक हा चित्रपट दाखवल गेला. या चित्रपटाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते सातवीतील सुमारे १६० विद्यार्थ्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या खडतर आणि क्रांतिकारी कार्याचा अनुभव घेतला. फुलेंनी जे कार्य केले आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही, असं राधिका नावाच्या एका चिमुकलीने चित्रपट पाहिल्यानंतर सांगितलंय...