तांदळाचा दाणा ते माचिसची काडी.. छोट्या गोष्टींवर शिवरायांची प्रतिमा साकारली
1043 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअखंड भारताचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह देशभर पाहायला मिळतं आहे.त्यातच पिंपरी चिंचवड शहरातील एका अवलियाने अतिशय लहानात लहान वस्तूंवर शिवरायांच्या मनोहारी प्रतिमा साकारल्या आहेत.सुरेश जाधव असं या सूक्ष्म चित्रे काढणाऱ्या अभियांत्रिकी अभियंता तरुणाचे नाव आहे.सुरेश जाधव यांनी तीळपासून ते झाडाची पाने साली यांच्यावर ५१ पेक्षा अधिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. यात शिवरायाच्या जीवनाशी निगडित विविध प्रसंग देखील त्यांनी या चित्रात साकारले आहे.सहज न दिसणाऱ्या डोळ्यांनी सहज न पाहता येणाऱ्या अश्या वस्तूवर त्यांनी ह्या कलाकृती साकारल्या आहेत.