मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं, पोलीस अधिकारी म्हणाले अशांना पाठिशी का घालता? : अजित पवार
1043 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारामतीतील जुन्या मंडईच्या ठिकाणी एक मोठे कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे.त्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार हे निरावागज मधील सभेमध्ये देत होते.त्यावेळी त्यांनी बारामती शहरातील जुन्या भाजी मंडईतील आठवणीतले किस्से सांगितले. त्यावेळी तत्यांनी भाजी मंडईतील दादागिरीचाही एक किस्सा सांगितला.हे सांगता सांगताच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेजारी उभे राहिलेले निरावागजचे रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे...माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांना मदत केल्याचा मुद्दा त्यांनी सांगितला.नानाला (विश्वास देवकाते) विचारा.. नानाचा एक जवळचा माणूस मोक्का मध्ये गुंतत होता, पण त्याला आपण वाचवले.त्याचवेळी दादा म्हणाले, एवढीच वेळ, पण पुन्हा जर हा त्या मार्गाला लागला, तर पुन्हा अजित पवारांकडे यायचं नाही. कारण मला अधिकारी म्हणतात की, दादा तुम्ही एवढे कडक बोलता आणि यांना कसे पाठीशी घालता?