मराठा आरक्षण मिळालं नाही तर मराठा आमदाराकडून हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याची तयारी : निलेश लंके
1824 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. राजकीय नेतेही आरक्षणप्रश्नी आक्रमक झाले असून विरोधकांनीही आरक्षणाची मागणी केली आहे. अशातच अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षण मिळालं नाही तर मराठा आमदाराकडून हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याची तयारी आमदार निलेश लंके यांनी दर्शवली आहे. मावळमधील कार्ला इथेदेखील ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. यावेळी याठिकाणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा आमदार निलेश लंके यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.