अजितदादांनी शिरुरसाठी दंड थोपटले, अमोल कोल्हे म्हणाले; जनता सुज्ञ, ती ठरवेल कोणाच्या बाजूने राहायचं...!
1370 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. शिरुरमध्ये पर्याय देणार अन् दिलेला उमेदवार निवडूनही आणणार असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, दादा फार मोठे आहेत, जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा दादांनी माझं कौतुक केलंय. अजितदादांनी जर विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याइतपत मी मोठा नाही. दादांनी माझा कान धरला आहे, पण यापुढे नक्कीच सुधारणा होईल, असंही यावेळी अमोल कोल्हे म्हणाले. सत्ता ही लोकांच्या समस्या सोडवण्याठी असते, त्यामुळे जनता सुज्ञ आहे. ती ठरवेल कोणाच्या बाजूने राहायचं.