१० वर्षांपूर्वी पती वारले, कोरोनामध्ये सासरे गेले; महिलेने पीठाची गिरणी चालवून उचलली कुटुंबाची जबाबदारी
1034 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे उचलणारा जसा 'कर्ता' पुरुष असतो तशीच कर्ती स्त्री सुद्धा....अन् प्रत्येक स्त्री सर्वार्थाने परिपूर्ण आहे हे सांगणारी असंख्य उदाहरणं आपल्या समोरच असतातच...त्याचपैकी एक म्हणजे पीठाच्या गिरणीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पुण्याच्या नंदिनी बागूल...१० वर्षांपूर्वी पती वारले, कोरोनामध्ये सासरे गेले अन् अचानक संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली...अशावेळी सहसा स्त्रिया दिसत नाहीत अशा व्यवसायात जाऊन नंदिनी यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळलंघरातील कमावत्या पुरुषांच्या निधनाने कोलमडलेल्या नंदिनींना आपली २ मुलं आणि सासुबाईंसाठी घरची जबाबदारी अंगावर घेणं क्रमप्राप्त होतं...अन् त्यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली...सुरुवातीच्या काळात फक्त चुल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहिलेल्या नंदिनी हिंमतीने स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या, कुटुबांच्या आधार बनल्या पण आजही समाजात अशा असंख्य स्त्रीया आहेत ज्या ही ताकद एकवट्याचे प्रयत्न करतायत...या स्त्रीयांना बळ देताना नंदिनी म्हणतात....