सुनेत्रा पवारांनी डोक्याला हातच लावला; वयाबाबत अजितदादांची मिश्किल टिपण्णी
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, बोलण्याच्या ओघात अजितदादांनी सुनेत्रा पवारांचीही चांगलीच फिरकी घेतली. लोकसंख्येचं प्रमाण, त्यातील तरूणांचा अन्व ज्येष्ठांचा टक्का अशा साऱ्यावर अजित पवार बोलत होते. यावेळी, ६० वर्षांच्या पुढील गटात या अजित पवारचाही नंबर लागतो असं सांगतानाच आता लवकरच सुनेत्राचाही नंबर लागणार असल्याचंही अजितदादा म्हणाले. अजितदादांच्या या वाक्यानंतर सुनेत्रा पवारांनी हसून डोक्यालाच हात लावला.