निलेश लंकेंनी दुसऱ्यांदा पुण्यात घेतली शरद पवारांची भेट, नगर दक्षिणची उमेदवारी पक्की?
1047 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करागेल्या ८ दिवसांत आज (१९ मार्च) दुसऱ्यांदा निलेश लंके हे शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झालेत. पुण्यातील मोदीबाग या ठिकाणी लंके शरद पवारांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे. या गाठीभेटींच्या सत्रामुळे नगर दक्षिणसाठी निलेश लंके हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. निलेश लंकेंनी अद्याप जरी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलेला नसला तरी हाती तुतारी घेऊन संकेत दिलेत.