करोना काळात काही कलाकारांना धुणी-भांडी करावी लागली; प्रिया बेर्डेंना अश्रू अनावर
1466 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढवण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या.तसेच राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबतही प्रिया बेर्डेंनी भूमिका स्पष्ट केल्या आहेत. भाजपमध्ये काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाते. येथे काम करण्यासाठी मोठी स्पेस आहे. एखादा प्रश्न आपण वरिष्ठ नेते म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्यासमोर घेऊन गेलो की ते प्रश्न लगेच मार्गी लागतात, असं म्हणत त्यांनी भाजपमधील नेत्याचं कौतुक केलं आहे.