अवघ्या ३ सेकंदांचा अपघात, मुलगा ब्रेन डेड; कुटुंबाचा एक निर्णय देणार ७ जणांना जीवनदान
1369 views
pune चे व्हिडिओ सबस्क्राईब करापिंपरी चिंचवडमधील या कुटुंबाने आपल्या चिमुकल्या लेकाचा मृत्यू पचवलाय...एकाच समाधानाने की तो आता अनेकांमधून जीवंत राहिल...भीषण अपघातानंतर मृत पावलेल्या आपल्या मुलाच्या शरीराचे तब्बल ७ अवयव दान करून या कुटुंबानं प्रत्येकापुढे एक आदर्शच ठेवलाय...आपल्यावरच्या दु:खातून सावरत इतरांना नव्याने आयुष्य जगण्याची नवी उमेद देणाऱ्या लोहाडे कुटुंबाचं कौतुक करावं तितकं थोडंय...पिंपरी चिंचवडच्या अक्षत लोहाडेचा स्पोर्ट बाईक चालवत असताना अपघात झाला. त्या अपघातात ब्रेन डेडने अक्षतचा दुर्दैवी मृत्यू झाला अन् कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली...सकाळी आनंदानं खेळणारा बागडणारा अक्षत आता राहिला नाही ही भावनाच काळीज चिरणारी होती पण तरी हे कुटुंब सावरलं अन् एक असा निर्णय घेतला ज्याचं समाधान आयुष्यभर मिळेल.अपघाताच्याच दिवशी सकाळीच आपल्यासोबत दंगामस्ती करणारा आपला लहान भाऊ अचानक सोडून गेल्यानं अक्षतची बहिणही हादरलीय...आपल्या मनातली सल सांगताना ती म्हणते...