गुन्हेगारी वाढली, हवेली पोलिसांनी गुंडांची धुलाई करत रस्त्यावरुन धिंड काढत दहशत मोडली!
1751 views
pune चे व्हिडिओ सबस्क्राईब करा२३ जुलै रोजी पुण्यातील खडकवासला येथील हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार झाल्याची घटना घडली होती. आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं सांगत वैभव इक्कर हा सराईत गुन्हेगार दहशत माजवित होता. खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात दहशत माजवल्यानंतर. तोडफोड केलेल्या हॉटेल व्यावसायिकाने हवेली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी वैभव इक्कर आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या. वैभव इक्कर आणि त्याचा साथीदार चेतन चोरघे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुंडाची दहशत कमी करण्यासाठी संबंधित गुन्हेगाराची पोलिसांनी धुलाई करत रस्त्यावरुन धिंड काढली. वैभव इक्कर (वय 23 रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असं धिंड काढलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.