वाढदिवशी सुट्टी ऐवजी कर्तव्याला प्राधान्य, आगीचा अनर्थ टळला, पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानाचे कौतुक!
1160 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करावाढदिवस म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती सर्वांत आधी सुट्टी.... त्यात सरकारी कर्मचारी असो वा खाजगी, पोलिस असो वा कुणी शिक्षक... प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे कुटुंबीय या दिवशी का होईना पण सुट्टी घ्यायला आग्रह करतात.... पण अशातही आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणारे लोकही तुम्ही आजही पाहिले असतील.... अशीच एक घटना घडलीये ती पुणे जिल्ह्यातील कोंढवा येथे...हे आहेत कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान दशरथ माळवदकर.... गेली २२ वर्षे माळवदकर अग्निशमन दलात सेवा बजावत आहेत. त्यांचा आज ५४ वा वाढदिवस.... वाढदिवशी ड्युटीवर निघालेल्या माळवदकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांनी सुट्टीसाठी आग्रह धरला. मात्र कोंढवा येथील कौसर बाग येथे आग लागल्याचं वृत्त समजलं आणि अग्निशमन दलाच्या या धाडसी जवानाने कर्तव्य आधी आणि वाढदिवस नंतर, असं म्हणत तत्परता दाखवली.