पुण्यातील जुळ्या बहिणींची अजबच कहाणी; प्राथमिक शिक्षणापासून ते दहावीपर्यंत समानच गुण
1120 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराया आहेत भावना आणि भक्ती. दोघीही अगदी दिसायला सेम टू सेम पण, त्यात सवयही साऱख्याच पण हे एवढ्यावर नाही थांबलं तर या दोघींना प्राथमिक शिक्षणापासून दहावीपर्यंत सारखेच गुण मिळालेत. हो बरोबर ऐकलंत. यंदा दोघींनाही दहावीत ९२.४० टक्के गुण मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या समान गुणाची चांगलीच चर्चा रंगत आहे.जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गुळूंचवाडी येथं राहणारं गुंजाळ कुटुंब, आणि या कुटुंबातील भावना आणि भक्ती या जुळ्या मुली. वडील 25 वर्षांपासून पुंडलिक गुंजाळ हे ट्रकचालक म्हणून काम करतात तर पत्नी वैशाली शेतकरी तसेच गृहिणी आहेत. या जुळ्या बहिणींनी बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे महाविद्यालयातून दहावीची परीक्षा दिली. परीक्षांच्या निकालात दोघींना समान गुण मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.