सोडत काढली, नंबर लागला, पैसे भरले पण घरच नाही?; म्हाडाचा अधिकारी गैरहजर, रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध
1064 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराम्हाडा सदनिकांच्या सोडतीसाठी नेमण्यात आलेल्या सॉफ्टवेअर कंपनीची प्रणाली सदोष असल्याचं समोर आलं. कुठलीही खातरजमा न करता या कंपनीला निविदा दिल्याने पुणे मंडळाच्या सोडतीत अनेक त्रुटी आढळून आल्या. याच पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी दिलेल्या थातूरमातूर उत्तरांमुळे संतप्त झालेल्या पुणेकरांनी आता अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. तब्बल २ महिन्यांपासून पैसे भरून देकरार पत्र मिळालं नसल्याने म्हाडाच्या विजेत्यांनी कार्यालयात गर्दी करत अधिकाऱ्यांना घेराव घातला. कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून पुणेकरांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे.