पुण्यात सातारा रस्त्यावर मध्यरात्री स्फोट, २ मजली इमारत ढासळली; दोनजण जखमी
1348 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुणे सातारा रस्त्यावर इंद्रायणी कॉम्प्लेक्सच्या देवयानी इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस अँड मोबाईल शॉपी दुकानमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की इमारतीच्या भिंतींना तडे बसले. दुकानातील सगळं सामानही जळून खाक झालं. या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास लागलेला नाहीये. आता एटीएसमार्फत तपास करणार असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिलीये. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तू होत्या. याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीची मोठी पडझड झालीये.