पुण्यातील श्रीराम पथकाचे अयोध्येत होणार ढोल-ताशा वादन, रामजन्मभूमी न्यासाकडून निमंत्रण
1471 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअयोध्येत भव्य मंदिरात विराजमान होणाऱ्या रामलल्लांचे स्वागत पुण्याच्या संस्कृतीत...महत्त्वाचे स्थान असलेल्या ढोल-ताशांच्या गजराने केले जाणार आहे.पुण्यातील श्रीराम पथकाला श्री रामजन्मभूमी न्यासाकडून वादन करण्याचे आमंत्रण प्राप्त झाले आहे.अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर होणाऱ्या सांस्कृतिक सप्ताहामध्ये सहभागी होऊन..पथकाचे १५० वादक ढोल-ताशा, झांज, हलगी वादन करणार आहेत.वाद्यपूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ५० ढोल, २५ ताशे आणि ध्वज अयोध्येला रवाना केले जाणार आहेत.अयोध्येप्रमाणेच श्रीराम पथकाचे वादक वाराणसीला काशी-विश्वेश्वर कॉरिडॉरमध्येही वादन करणार असूनकाशी-विश्वेश्वर संस्थानकडूनही पथकाला आमंत्रण देण्यात आले असल्याचे पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.