खडतर परिस्थितीत आईवडिलांनी शिकवलं, यूपीएससी परीक्षेत मंगेश खिलारीला यश
Curated by Shantanu Kulkarni|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|23 May 2023
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीचा मंगेश खिलारी याने ३९६ वी रँक मिळविली आहे. अवघ्या २३ व्या वर्षी मंगेश ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याचे वडील गावी चहाची टपरी चालवितात, तर आई विडी कामगार आहे.