राष्ट्रवादीतील फूट म्हणजे मोदींनी घोटाळा समोर आणला म्हणून रचलेला डाव , शरद पवारांवर जुन्या सहकाऱ्याचा आरोप
1477 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन गट निर्माण झाल्याने राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागलं आहे. सध्या राष्ट्रवादीतील दोन्ही पवारांमध्ये फूट पडल्याने पुढील काळात राजकीय समीकरणे कमालीची बदलण्याची शक्यता आहे. या फुटी बाबत शरद पवारांचे एकेकाळचे त्यांचे सहकारी व सध्याचे विरोधक चंद्रराव तावरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही फूट केवळ लोकांना दाखवण्यासाठी आहे असं चंद्रराव तावरे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटींचा घोटाळा समोर आणल्याने हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले.