पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची गुप्त भेट, राष्ट्रवादीत काय घडतंय?
1247 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांमध्ये कोरेगाव पार्क येथील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यामध्ये बैठक झाली अशा चर्चा आहेत. कोरेगाव पार्क मधील बंगला क्रमांक ७३ मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं बोललं जातंय. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, ज्यांच्या घरी भेट झाल्याची चर्चा आहे त्या अतुल चोरडिया यांनी या भेटीचं वृत्त फेटाळलं आहे. चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार सर्किट हाऊस या ठिकाणी आले. त्यानंतर सरकारी ताफा त्याच ठिकाणी ठेऊन अजित पवार खासगी वाहनाने कोरेगाव पार्क याठिकाणी पोहचले, अशी सूत्रांची माहिती आहे.