'सत्यशोधक' चित्रपटात कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही, उत्तम पद्धतीने साकारलेला चित्रपट : शरद पवार
1044 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा‘सत्यशोधक’ चित्रपटामुळे, अस्पृश्यता निवारण, शिक्षणप्रसार, सामाजिक सुधारणांसाठी फुले दांपत्याने घेतलेले कष्ट केलेला त्याग, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रेरणादायी लढा सर्वांसमोर येणार आहे.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा सिनेमा...राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील चित्रपट गृहात जाऊन सपत्नीक पाहिला.हा चित्रपट पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, हा एक उत्तम चित्रपट आहे. त्यामध्ये फुलेच्या आयुष्यातील प्रसंग वास्तव रुपात मांडण्यात आलेले आहेत.कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. अतिशय प्रभावी पद्धतीने साकारण्यात आलेला हा चित्रपट...महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये दाखवण्यात यावा अशी विनंती राज्य सरकारला करणार आहे.सत्यशोधक याचा अर्थ कुठल्या जाती धर्माचा विरोध नसून वास्तविकता आहे.हा विचार नव्या पिढीपर्यंत जाणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.