बारामतीतील नव्या पक्षकार्यालयाला शरद पवारांची भेट, लेकीचं तोंड भरून कौतुक केलं
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बारामती दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी भेट दौरे सुरू केले आहेत. त्यात आज बारामतीत असताना त्यांनी नव्या कार्यालयाला भेट दिली. मला वयाच्या २६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी मिळाली असं पवारांनी सांगितलं. त्यावेळी माझ्याविरोधात एका साखर कारखान्याचे अध्यक्ष होते असं पवारांनी सांगितलं. सत्तर हजार मतांनी मला निवडून दिलं. असे म्हणत शरद पवारांनी पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली. तसंच यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांचं कौतुकही शरद पवारांनी केलं. सुप्रिया सुळे देशातील ५१८ खासदरापैकी त्यांचा पहिल्या तीनमध्ये आहेत असं पवार म्हणाले. सुप्रिया सुळेंना खासदार म्हणून पुन्हा एकदा संधी द्यायची आहे आणि मला विश्वास आहे ती संधी तुम्ही पुन्हा एकदा द्याल, असे शरद पवार म्हणाले.