समोरचा उमेदवारच डमी अन् नाईलाजाने दिलेला; अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका
1280 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत पण विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हेंनी विरोधकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डाॅ. अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ मंचर शहरात पदयात्रा आणि कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, समोरचा उमेदवारच डमी उमेदवार असल्याचं म्हणत कोल्हेंनी आढळराव पाटलांना डिवचलं. मला वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईसने आलेला उमेदवार असेल, पण हा आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार असल्याचं कोल्हे म्हणाले.