शिवाजीराव आढळराव पाटलांचं ठरलं! २६ मार्चला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश निश्चित
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.२६ मार्च रोजी शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील.तिन्ही पक्षांची सहमती असलेला उमेदवार म्हणून माजी उमेदवारी निश्चित झाली आहे असं आढळराव पाटील म्हणाले.माझ्या प्रवेशावेळी ठराविकच कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.दिल्लीतून ग्रीन सिंगल येईल त्यावेळी सर्व माहायुतीच्या उमेदवारांची नावे समोर येणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेश केल्याने स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत येतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.