सुनेत्रा अजित पवार शिरुरमध्ये अॅक्टिव्ह, अमोल कोल्हेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तयारी सुरु?
1112 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरु केलीय...यासाठी दादांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय..बारामती लोकसभा मतदारसंघासह शिरूर लोकसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवारांनी ताकद पणाला लावलीय....काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार डाॅ अमोल कोल्हेंना येत्या लोकसभा निवडणुकीसाठी थेट आव्हान दिलंय...अन् कोल्हेंना पाडण्यासाठी आता शिरूरमध्ये पूर्ण पवार फॅमिली कामाला लागलीय...अजित पवारांच्या चॅलेंज नंतर पुत्र पार्थ पवारांनी शिरूर लोकसभेत येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून मोर्चे बांधणीला सुरुवात केली तर आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही या मतदारसंघात ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत.