उदयनराजे भोसले अन् वसंत मोरेंची शरद पवार गटात एंट्री? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
1154 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवरील कारवाई, तसेच लोकसभेच्या तोंडावर समोर आलेला इलेक्ट्रोल बाँडचा मुद्दा, अजित पवारांकडून होणारी तसेच मिमिक्री, वसंत मोरे आणि उदयराजेंच्या शरद पवार गटातील संभाव्य प्रवेशाच्या चर्चा, काँग्रेस नसती तर... या पुस्तकाचं प्रकाशन अशा विविध मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांकडून होणाऱ्या टीका, मिमिक्रीचा मुद्दा काढताच आपण याकडे लक्ष देत नाही असं म्हणतसुप्रिया सुळेंनी प्रश्नाला बगल दिली. तर, काँग्रेस नसती तर...काय झालं असतं यावर सविस्तर चर्चा करायला मी कधीही तयार असल्याचं आव्हानही सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. तसेच, विजय शिवतारेंच्या बारामतीत लढण्याचा आपल्याला फायदा होईल का? यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.