एकेकाळी भंगार गोळा करणाऱ्या मुलीला नवी उमेद दिली, 'मस्ती की पाठशाला'नं आयुष्य बदललं
असाच एक हात भंगार गोळा करणाऱ्या या शकुंतलाला मिळाला आणि तिचं आयुष्य पालटलं... आणि हा हात होता पिंपरी चिंचवडमध्ये मस्ती की पाठशाला हा उपक्रम राबवणाऱ्या शिक्षिका प्राजक्ता रुद्रावार यांचा.शंकुंतला आदिवासी ही आदिवासी समाजातील पिंपरी चिंचवडमधील मस्के वस्ती या भागातील झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी. आई वडील दोघेही मजुरी करून पोट भरतात. मात्र आई आणि वडील दोघेही व्यसनाधीन आणि घरात खायला अन्न नसल्याने भावासाठी आणि स्वतःसाठी तिने एवढंशा वयात ती रस्त्यावर भंगार गोळा करू लागली. मात्र शकुंतला मस्ती की पाठशाला मध्ये आली आणि तिला शिक्षणाची गोडी लागली.शाळेत आल्यानंतर शिक्षणानं शकुंतलामध्ये बदल घडून आल्याचं शिक्षका प्राजक्ता रूद्रवार सांगतात. शकुंतलाला शिक्षणाच्या प्रवाहात आल्याने तिची जगण्याची उमेद पुन्हा जागी झाली आहे. कुटुंबाची परिस्थिती बदलण्याचं स्वप्न आता या चिमुकल्या डोळ्यांमध्ये दिसू लागलंय.अभ्यासासोबतच फुटबॉलची आवड शकुंतलाला आता लागली आहे. तिच्यात झालेलं हे परिवर्तन हे एका गुरुलाही बळ देणारं आहे.प्राजक्ता यांनी शकुंतला सारख्या मुलांचं आयुष्य घडवलंय, शिक्षणाचा गंध नसणाऱ्या मुलांना घडवणाऱ्या या सावित्रीला सलाम..puneTimesXP MarathiUpdated: 7 Mar 2024, 4:17 pm