कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय : अजित पवार
1620 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्यात होते. कंत्राटी भरतीच्या मुद्यावरुन अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, कंत्राटी भरतीच्या मुद्यावर मला विनाकारण ट्रोल केलं जातय. विरोधकांना उकाळ्या फुटतात, काहीही व्हॉट्सअपवर शेअर करतात. नवीन भरती होईपर्यंत कंत्राटी भरती असा मागच्या काळातला निर्णय आहे, असं अजित पवार म्हणाले. शासकीय रुग्णालयात स्टाफ कमी आहे हे खरं आहे. आपण दीड लाख जागांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहोत. कारण नसताना गैरसमज करु नका. काहीही करुन आमच्यावर बिल फाडण्याचा प्रयत्न आहे, असंही पवार म्हणाले.