थिएटर नाकारले; शेकडो ट्रॅक्टर, हजारो लोक, शिरुरमध्ये 'टीडीएम'साठी गगनभेदी घोषणाबाजी!
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
'टीडीएम'... ज्या चित्रपटासाठी प्रेक्षक येऊन देखील थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या कलाकारांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. हा चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो ट्रॅक्टर मोर्चामुळे.... चित्रपटाला शो मिळत नसल्याने दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या चित्रपटाला शो मिळावे यासाठी शिरूरमधील नागरिक थेट रस्त्यावर उतरलेत. एखादया चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक एकवटल्याचे दुर्मिळ चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळतंय.