जगात मोदींना पर्याय नाही, ते १८-१८ तास काम करतात, त्यांना व्हिजन आहे; अजित पवारांची स्तुतीसुमनं
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक मिशन २०२३ महामेळाव्यातून आज (११ फेब्रुवारी) अजित पवार कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना संबोधित करत होते. आपण शरद पवारांपासून फारकत घेणारी भूमिका का स्वीकारली? याबाबत अजित पवार सविस्तर बोलले. वरिष्ठ समजून घेत नव्हते म्हणून नाईलाजाने ही राजकीय भूमिका घ्यावी लागली हेच सांगताना अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना पर्याय नसल्याचं म्हणत स्तुतीसुमनं उधळली. जगात मोदींना पर्याय नाही, आता आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, ते १८-१८ तास काम करतात, त्यांना व्हिजन आहे, असं अजित पवार म्हणाले.