तीन दिवसांत बारामतीत पुन्हा विमान अपघात, वैमानिक किरकोळ जखमी
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बारामती रेडबर्ड प्लाईट ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा आज (२२ ऑक्टोबर) पुन्हा अपघात झालाय. रेडबर्ड प्लाईट ट्रेनिंग सेंटर च्या VT- RBT या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळलं.१९ ऑक्टोबर रोजी रेड बर्ड कंपनीच्याच विमानाचा विमानतळानजिक अपघात झाला होता.बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरात आज सकाळी हा अपघात झालाय. या विमानात एक पायलट ट्रेनर व प्रशिक्षणार्थी होता.या अपघातात वैमानिकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.