वसंत मोरेंना वंचितकडून मोठी ताकद! पुणे लोकसभेची उमेदवारी, तिरंगी लढतीकडे राज्याचं लक्ष
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकल्यानंतर पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत आव्हान निर्माण करण्यासाठी ताकदीने सज्ज असणाऱ्या वसंत मोरेंना वंचितकडून संधी देण्यात आली आहे. वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. सोशल मीडियामुळे वसंत मोरे हे राज्याच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत असतात. तसेच, पुण्यात वसंत मोरेंचा एक मोठा चाहतावर्ग असून याचा मोठा फायदा होऊ शकतो. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांच्यासमोर वसंत मोरे मैदानात उतरले असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे.